आता खरा राडा होणार! आता संपूर्ण ५४ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार..
मुंबई : नुकताच लागलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाच्या केवळ १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेतील, असे आतापर्यंत समजले जात होते. असे असताना आता मात्र राहुल नार्वेकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
ते म्हणाले, आपल्याला केवळ शिंदे गटाच्या १६ आमदारांबाबत नव्हे तर शिवसेनेच्या सर्व ५४ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचा आहे, असे महत्त्वाचे विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
यामुळे आता राहुल नार्वेकर यांनी हे महत्त्वाचे विधान करून सत्तासंघर्षात आणखी नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडल्याचे कोणतेही लेखी निवेदन माझ्यापुढे अद्याप सादर झालेला नाही, अशी महत्त्वाची माहितीही राहुल नार्वेकर यांनी दिली.
त्यामुळे केवळ १६ नव्हे तर शिवसेनेच्या सर्व ५४ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर निर्णय घ्यायचा आहे, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. यामुळे आता नक्की काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा अपात्रतेचा फटका ठाकरे गटाला बसणार की शिंदे गटाला? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे राज्याचे लक्ष आता नार्वेकर यांच्या निकालाकडे लागले आहे.