आता समृद्धी महामार्ग राजधानी दिल्लीला जोडला जाणार, नवीन हायवे तयार, जाणून घ्या…

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील मुख्य असलेला मुंबई नागपूरला जवळ करणारा समृद्धी महामार्ग आता देशाची राजधानी दिल्लीशी जोडला जाणार आहे. आता ‘आमने ते बडोदा – मुंबई द्रुतगती मार्ग’ पूर्ण झाला आहे. यामुळे याला जोडून आता राजधानी दिल्लीत प्रवास करावा लागणार आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस महामार्ग प्रकल्पाचा शेवटचा टप्पा पूर्ण होणार आहे.
त्यानंतर काही दिवसात महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. समृद्धी महामार्ग या ७०१ किमी लांब महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर वीस तासांवरुन आठ तासांवर आला. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढून व्यापारही वाढला. हा देशातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग आहे.
आता इगतपुरी-नागपूर-इगतपुरी अशा तीन टप्प्यांमध्ये सुरु आहे. आता हा महामार्ग थेट दिल्लीशी जोडला जाणार आहे. बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्ग उभारला जात आहे. या कामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. यामुळे येणाऱ्या काळात हे काम देखील लवकरच पूर्ण होईल. सहा महिन्यात हे काम पूर्ण होईल.
दरम्यान, हा महामार्ग दक्षिणेकडे आमनेनंतर अंबरनाथजवळील भोज आणि तिथून पुढे मोरबेपर्यंत तयार केला जाणार आहे. पुढे जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरणापर्यंत नेला जाणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमधील दळणवळणाचे प्रमाण वाढत आहे.
याबाबत एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले की, आता नव्या महामार्गामुळे समृद्धी महामार्ग दिल्लीला जोडला जाईल. यामुळे अजून दळण वळण वाढणार आहे. समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पादेखील पूर्ण झाला आहे.