आता सायबर ठगांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी, दोन महिन्यात सहा वेळा बसला फटका..


पुणे : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. डिजिटलच्या या युगात ठगसुद्धा डिजिटल झाले आहेत. सायबर ठग सर्वसामान्य लोकांना फसवण्यासाठी विविध प्रकार करत असतात. मग यासंदर्भात राज्यात सायबर पोलिसांकडे रोज तक्रारी येतात.

या तक्रारींची संख्या शेकडोमध्ये आहे. आता पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना सायबर ठगांचा फटका बसला आहे. दोन महिन्यात तब्बल सहा वेळा त्यांना सायबर ठगांनी फटका दिला आहे.

सायबर चोरट्यांच्या रडावर पुण्याचे जिल्हाधिकारी आले आहेत. डॉक्टर राजेश देशमुख यांचे आणखी एक बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले आहे. सायबर ठगांनी राजेश देशमुख यांची बनावट प्रोफाईल तयार करून, बायोमध्ये आयएएस असे लिहीत त्यांच्या प्रतिमांचा वापर करण्यात आला आहे.पुणे जिल्ह्याचे

जिल्हाधिकारी असलेल्या डॉक्टर राजेश देशमुख यांच्याबाबत दोन महिन्यांत सहाव्यांदा हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी त्यांनी अनेकदा सायबर पोलिसात तक्रार सुद्धा केली आहे. परंतु अजूनपर्यंत एकावरही कारवाई झाली नाही. चक्क जिल्हाधिकारींचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले जात असतानाही आतापर्यंत कोणावर कारवाई झाली नाही. यामुळे सामान्य व्यक्तींच्या प्रकरणांचा तपास कसा लागणार? हा प्रश्न आहे.

दोन महिन्यात पाच ते सहा वेळा डॉक्टर राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट खाते तयार करून सायबर चोरटे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहेत. त्यांनी यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रारसुद्धा दिली आहे. तसेच कुठल्याही बनावट अकाउंटला बळी पडू नका, असे आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!