आता रायगडावर हिराबाई मावशी दिसणार नाहीत!! वयाच्या 80 व्या वर्षी निधन, शिवप्रेमी हळहळले…


रायगड : किल्ले रायगडवर ताकाचा व्यवसाय करणाऱ्या अनेक वर्ष प्रसिद्ध असलेल्या हिराबाई उर्फ मावशी अवकीरकर यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवरायांच्या काळातील राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर गेली 70 वर्ष हिराबाई या ताक विक्रीचा व्यवसाय करत होत्या.

तसेच शिवभक्तांना लागेल ती आवश्यक मदतही त्या करणार असं हे मार्गदर्शक व्यक्तिमत्व होतं. रायगडावर येणाऱ्या सगळ्यांची आपुलकीने चौकशी करत, आवश्यक ती मदत करणाऱ्या हिराबाई आता पुन्हा भेटणार नाहीत मात्र आमच्या या लाडक्या मावशीच्या आठवणी या आमच्यासोबत कायम चिरंतन राहतील, अशा भावना आता व्यक्त केल्या जात आहेत.

हिराबाईंचा वाडा याच रायगड किल्ल्यावर आहे. अनेक दिग्गज मंडळींनी हिराबाईंच्या या वाड्याला भेट दिली आहे. गडावर जाणाऱ्या शिवभक्तांना किल्ले रायगड पायरी मार्गाने जाताना चित्तदरवाज्यापासून मध्यभागी विसाव्याचे ठिकाण म्हणून हिराबाईंचा वाडा सगळ्यांसाठी हक्काचं असं ठिकाण आहे. याठिकाणी त्या सगळ्यांशी आपुलकीने विचारपूस करत होत्या.

गेल्या अनेक दिवस आजारी होत्या. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी रायगडावर मावशींच्या वाड्याकडे धाव घेतली. त्यांच्या मृत्यूमुळे शिवभक्तांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता आपल्याला रायगड किल्ल्यावर त्या दिसणार नाहीत, असं दुःख अनेकांना आहे. इतिहासाचे अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, साहित्यिक कै. गो.नी.उर्फ आप्पासाहेब दांडेकर अशा अनेक मान्यवरांनी गडावर आल्यावर मावशींच्या वाड्यामध्ये थांबून ताकाचा आस्वाद घेतला.

रायगडावर चित्त दरवाजा ते बालेकिल्ला दरम्यान मध्यभागी असलेल्या हिरकणी बुरुजाच्या जवळच हिराबाई अवकीरकर मावशींचा वाडा आहे. त्यांच्या पश्चात मुले, पुतणे, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या याठिकाणी ताक देत सर्वांशी आपुलकीने चौकशी करत असत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!