पुणेकरांसाठी सर्वात मोठी बातमी! आता पुणेकरांना मोफत मेट्रो, बस प्रवास, जाणून घ्या महत्त्वाची माहिती..


पुणे : राज्यात २९ महापालिकांचा निवडणुका आहेत. कुठे युती आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या जात आहेत. तर कुठे स्वतंत्रपणे. राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत अजित पवारांची राष्ट्रीवादी असून ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.

मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ते भाजपाविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चक्क दोन्ही राष्ट्रीवादी एकत्र आल्याचे बघायला मिळतंय. नुकताच पुण्यात दोन्ही राष्ट्रीवादीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठं आश्वासन दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणेकरांना मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचे आश्वासन देण्यात आले आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्ते यामुळे पुणेकरांचे पेट्रोलच्या स्वरूपात दररोज साडे सात कोटी रुपये वाया जातात. अशाप्रकारे वर्षाला दहा हजार आठशे कोटी रुपये पेट्रोलच्या स्वरूपात वाया जातात.

त्यामुळे ते पैसे मेट्रोच्या प्रवासासाठी वापरता येतील, असा मोठा प्लॅन अजित पवारांनी सांगितला आहे. मोठ्या प्रमाणावर पीएमपीएल बस आणि मेट्रोतून प्रवास झाला तर रस्त्यावर वाहनं कमी होतील यातुन पुणे प्रदुषणमुक्त होईल. हे शक्य आहे. अनेक तज्ञांशी बोलून मी हे सांगतो आहे. आमच्या ताब्यात महापालिका दिली तर मी मोफत मेट्रो हे करून दाखवीन, असं आश्वासन अजित पवारांनी दिले आहे.

आम्ही पुण्यात राहतो. त्यामुळे आम्हाला पुणेकरांबद्दल जिव्हाळा आहे. इतर बाहेरचे कोणी आले तर तेवढ्यापुरतेच येतील. त्यामुळे आम्हालाच संधी द्या, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

मोफत मेट्रो, मोफत बस , ५०० फुटांपर्यंत घरांना कर माफी, टॅंकर मुक्त पुणे, मोफत टॅब, शहरातील मिसिंग लिंक रोड पुर्ण करणार, कचऱ्याचे १०० टक्के वर्गिकरण करणार, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार, टेलिमेडीसन सुविधा उपलब्ध करणारं, गुंठेवारी तिनं महिन्यात पुर्ण करणार , १५० मॉडेल शाळांना मंजुरी, अशी आश्वासने अजित पवारांनी दिली आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!