आता छगन भुजबळ यांचाही प्रदेशाध्यक्ष पदावर दावा! म्हणाले, मला ते पद दिले तर मी…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या काही दिवसापासून मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको, तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी एका कार्यक्रमात केली आहे.
यामुळे चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे शरद पवार पुन्हा एकदा भाकरी फिरवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावेळी छगन भुजबळ यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्षपद मला दिले, तर मी काम करेन. राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसी समाजाला द्यायला हवे.
त्यामुळे सुनील तटकरे, धनंजय मुंडे , जितेंद्र आव्हाड हे ओबीसी चेहरे आहेत. त्यांना संधी द्यायला हवी. मला संधी मिळाली तर मी देखील काम करेन. असेही ते म्हणाले.
यामुळे आता छगन भुजबळ की अजित पवार कोणाला प्रदेशाध्यक्ष पद मिळणार? आणि जयंत पाटील यांच्या पदाच काय होणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यामुळे शरद पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.