पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या; परिसरात खळबळ


पुणे : हडपसर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तडीपार गुंड राणा कांबळे याच्यावर भररस्त्यात कोयत्याने हल्ला करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक रस्त्यावरच राणा कांबळेवर हल्ला केला. या हल्ल्यात कोयत्याचा वापर करण्यात आला असून, तो गंभीर जखमी झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या घटनेमागे जुने वाद किंवा टोळी संघर्ष असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!