मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार, मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


रायगड : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांचा २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक’ असे संबोधत हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.

सुमारे १९.१६ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी ७,१८१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खोपोली ते कुसगाव दरम्यानचे अंतर ६ किमीने कमी होणार असून, घाटातील अवघड वळणे टाळता येणार आहेत. यामुळे अपघातात घट होऊन प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.

या ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, २३.५ मीटर रुंदीचे बोगदे, ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. बोगद्यांमध्ये दर ५० मीटरवर आपत्कालीन सुविधा आणि दर ३०० मीटरवर कनेक्टिंग मार्ग तयार करण्यात आले आहेत.

कोविड काळातील अडचणींवर मात करत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या प्रकल्पामुळे दररोज सुमारे १ कोटी रुपयांची इंधन बचत होणार असून, प्रदूषणातही घट होण्यास मदत होणार आहे.

सरकारच्या मते, ‘मिसिंग लिंक’ उर्फ ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुसाट होणार असून राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!