कितीही मोठ्या बापाचा असूदे, टायरमध्ये घेऊन झोडायला सांगणार!! अजित दादांनी बारामतीत दिला थेट इशारा…


बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. बारामतीत सावित्री हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, काही जण चुका करत आहेत. रस्त्यावर कचरा टाकत आहेत. कृपा करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत. जनावरे चरायला सोडत आहेत.

मी त्यांना कृपा करून सांगतो, आता ती जनावरे कोंडवड्यात घातली. नाही ऐकलं तर त्यांना बाजार दाखवतो. आता जे मालक लोक आहेत, त्यांना इशारा देतो ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील, असा इशारा अजित पवार यांनी दिला. अनेक कामे केली आहेत त्याची निगा राखली पाहिजे.

तसेच ते म्हणाले, कधी मोटरसायकलवाले इकडे तिकडे बघतात. ओव्हरटेक करतात, राँग साईडने जाण्याचा प्रयत्न करतात. असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

अजिबात नियम कोणी तोडू नका. मग तो अजित पवार असो किंवा अजित पवाराचा कोणी नातेवाईक असेल. सर्वांना नियम सारखा. मी जे करतो ते बारामतीकरांसाठी सर्वांसाठी करतो, असेही अजित पवार म्हणाले.

तसेच आई वडिलांचा आदर करा, आईसारखं कुणी नसतं. मी पण ज्यावेळेस बारामतीत येतो त्यावेळेस आईला भेटतो. आज मला भरपूर कामे आहेत. मात्र रात्रीच मी आईला भेटलो. दर्शन घेतलं. तिच्याशी गप्पा मारल्या, आईशी अतिशय आपलेपणाने वागा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!