मोठी घोषणा ; सात लाख रुपयापर्यंत उत्पन्नावर आयकर नाही ; निर्मला सितारामन यांची घोषणा…!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन सादर करत असलेल्या बजेटमधील ठळक मुद्दे :

- आयकराची मर्यादा 5 लाखांवरून 7 लाखांवर
- यावर्षी 6.5 कोटी कर परतावा
- अनेक वस्तूंना कस्टम ड्युटीतून सूट
- रेल्वे विभागासाठी 2.4 लाख कोटींचा निधी
- 50 नवीन विमानतळे उभारणार
- मोबाईल पार्ट्सच्या आयातीला अनेक वस्तूंना कस्टम ड्युटीतून सूट
- महिला सन्मान बचत पत्रची घोषणा
- नवी लहान बचत योजना, दोन वर्षांसाठी गुंतवणूक करणार
- 2 लाखांपर्यंतची रक्कम 2 वर्षांसाठी ठेवता येणार, 7.5 टक्क्यांनी व्याजदर
- पर्यटनाला आवश्यक सोयी-सुविधा पुरवल्या जाणार, 50 पर्यटनाच्या स्थळांचा विचार केला जाणार, देखो अपना देश योजना कार्यान्वित करणार, स्वदेश दर्शन योजना कार्यान्वित, ग्रामीण भारताचे दर्शन होण्याकरता योजना राबवणार
- प्रदूषण करणारी जुनी वाहनं स्क्रॅप करणारी पॉलिसी राबवणार, आवश्यक तो निधी देणार
- तरुणांना प्रोत्साहन देण्याकरता राष्ट्रीय शिक्षण धोरणांतून कौशल्यविकासावर भर देणार, त्यातून रोजगार निर्मितीचं शिक्षण देणार, व्यवसाय, व्यवस्थापनाचे धडे देणार
- उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक असलेले स्किल विद्यार्थ्यांना देण्याकरता योजना राबवणार
- 30 स्किल इंडिया सेटअप भारतभर स्थापन करणार
- अर्थव्यवस्था पर्यावरणपूरक करण्यासाठी 19700 कोटींची तरतूद
- 2030 सालापर्यंत कार्बन निर्मिती कमी करण्याचा प्रयत्न
- पर्यावरणपूरक विकास, 2070 सालापर्यंत कार्बन फ्री होण्याच्या दिशेने पावलं पडत आहे.
- सात हजार कोटींचा खर्च करून ई-कोर्ट सुरू करणार
Views:
[jp_post_view]