कोरेगावमूळ सरपंच विठ्ठल शितोळे यांच्याविरोधात १० विरुद्ध ३ मतांनी अविश्वास ठराव मंजूर…!


उरुळी कांचन : कोरेगावमूळ (ता.हवेली ) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्याविरोधात १० सदस्यांनी दाखल केलेला अविश्वासाचा ठराव १० विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाला आहे. त्यामुळे सरपंचपदावरुन विठ्ठल शितोळे यांचा पायउतार झाला आहे.

कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या सरपंच विठ्ठल शितोळे यांच्या विरोधात बुधवार (दि.१५) दाखल केला होता. त्यानुसार सोमवार (दि.२१) रोजी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी अविश्वास ठरावावर बैठक घेतली. किरण सुरवसे यांनी सदस्यांची मते विश्वासात घेऊन अविश्वास ठरावावर गुप्त पद्धतीने मतदान घेतले. या मतदानात अविश्वास ठरावाच्या बाजूने १० व विरोधात ३ मते पडल्याने तहसिलदार किरण सुरवसे यांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. यावेळी उरुळी कांचन मंडलअधिकारी नूरजहाँ सय्यद उपस्थित होत्या.

यावेळी उपसरपंच वैशाली अमित सावंत, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब यशवंत बोधे, भानुदास खंडेराव जेधे, मंगेश अशोक कानकाटे, सचिन गुलाब निकाळजे, लिलावती  बोधे, अश्विनी चिंतामणी कड, राधिका संतोष काकडे, मंगल जगन्नाथ पवार, पल्लवी रमेश नाजीरकर , दत्तात्रय ज्ञानेश्वर काकडे, मनिषा नंदकिशोर काकडे आदी सदस्यांनी अविश्वास ठरावास मतदान केले. दरम्यान अविश्वास ठराव प्रक्रियेदरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!