टायर फुटून बसचा अपघात नाही, आरटीओच्या प्राथमिक अहवालात मोठी माहिती समोर..


मुंबई : बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री झालेल्या भीषण अपघातात बसला आग लागल्याने २६ प्रवासी जिवंत जळून खाक झाले. तर, चालक, क्लिनरसह आठ जण बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आहेत.

अपघाताबद्दल प्रत्यक्षदर्शीने थरारक प्रसंग सांगितला आहे. नागपूर-पुणे दरम्यान समृद्धी द्रुतगती मार्गावर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. आता याबाबत माहिती समोर येऊ लागली आहे.

टायर फुटल्याने बसचा अपघात झाला नाही. बस अपघाताबाबत अमरावतीच्या आरटीओने अहवाल सादर केला आहे. या अहवालात आणि चालकाने दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार टायर फुटून भीषण अपघात झाला. मात्र आरटीओने दिलेल्या अहवालात बसचे टायर फुटलेच नाही अशी माहिती समोर आली आहे.

अपघातातून बचावलेल्या व्यक्तीने सांगितले की, आम्ही अपघाताच्या ठिकाणी पोहचल्यानंतर पाहिलं, तर भयंकर परिस्थिती होती. आमच्या डोळ्याने लोक होरपळताना पाहत होतो. गाडीने मोठा पेट घेतला होता. गाडीचे दोन टायर बाजूला पडले होते.

अपघात झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले की, कोणीतरी थांबेल आणि मदत करेल. मात्र, भावनाशून्य लोक या जगात आहेत. त्यातील कोणीही याठिकाणी थांबले नाहीत.

बसमध्ये एक महिला आणि लहान मुलगा होता. अपघातानंतर त्यांना बसच्या मागील बाजूने बाहेर काढण्यात आले. पण, ते लहान मुल पूर्ण होरपळलेलं पाहून अंगावर शहारे आले. काच फोडण्यासाठी काही मिळालं असते, तर ते लोक वाचले असते. असे सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!