Nitesh Rane : लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार? नितेश राणेंच्या एका वक्तव्यावरुन बहिणींना धक्का, नेमकं काय म्हणाले?


Nitesh Rane  : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना केलेल्या अर्जाची छाननी होणार आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. लाडक्या बहिणीच्या निकषावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार की नाही यावरुन द्विधा मनस्थिती आहे. आता याच दरम्यान नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. नितेश राणे यांनी लाडकी बहीण योजनेवर जे वक्तव्य केलं त्याने खळबळ उडाली आहे.

या वक्तव्यानंतर नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहीणवरुन चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, निवडणुका आल्या की त्यांना आपला धर्म प्रिय असतो मात्र लाडकी बहीणच्या योजनाचा फायदा या लोकांनी घेतला.

या योजनेचा फायदा दोन अपत्य असणा-याना या योजनेचा फायदा देऊ नका अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे. नितेश राणे यांनी नाव न घेता दोन मुलं असलेल्या मुस्लीम कुटुंबांना वगळावं अशी विनंती केली आहे. Nitesh Rane

या योजनेतून आदिवासी बांधवांना सूट द्या, मुस्लीम सोडून दोन आपत्य असणाऱ्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचणार असा निकषात बदल करा असं नितेश राणें एका भाषणादरम्यान बोलले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group