Nilesh Lanke : खासदार निलेश लंकेच अजब स्पष्टीकरण! म्हणे मला कुख्यात गुंड गज्या मारणे माहितीच नव्हता…

Nilesh Lanke : पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेणे अन् त्याच्याकडून सत्कार स्वीकरण्याचा प्रकार खासदार निलेश लंके यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्या प्रकारानंतर अडचणीत आले आहे.
निलेश लंके यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर लंके यांनी आता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपण समाजकार्यात काम करणारी माणसं. कोणीही गाडीला हात केला की थांबतो. काल त्यांच्या घरासमोरून जात असताना त्यांनी हात केला.
मी थांबलो. त्यांनी चहा प्यायला चला म्हणून सांगितले. आम्ही चहा घेतला. त्यांनी माझा सत्कारही केला. तोपर्यंत मला समोरील “सन्माननीय” व्यक्ती कोण, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे माहिती नव्हते. अस अजब स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिले आहे.
ते पुढे म्हणाले, कुख्यात गुंड गज्या मारणे होता हे मला आज सकाळी मला कळाले. काल ज्यांना आपण भेटलो ते अशा अशा प्रवृत्तीची व्यक्ती होती. मला आधी माहिती असते तर मी तेथे गेलो नसतो. ही घटना अपघाताने घडली. तरीही ती चूकच म्हणावी लागेल. असे स्पष्टीकरण दिले आहे. Nilesh Lanke
निलेश लंके काय म्हणाले?
मी दिल्लीवरुन आलो. माझे पवार नावाचे सहकारी होते. त्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांची भेट झाल्यानंतर आम्ही परत निघालो. त्यावेळी त्या भागातील आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी प्रविण धनवे यांच्या घरी गेलो.
त्याच्या घरुन निघाल्यानंतर मारणे यांच्या घराजवळ आम्हाला चार सहा लोकांनी थांबवले. त्यांनी चहा पिण्यासाठी बोलवले. आम्हाला तोपर्यंत कोणाची काहीच पार्श्वभूमी माहीत नव्हती.
त्यावेळी माझा सत्कार करण्यात आला. तोपर्यंत गजानन मारणे कोण हे मला माहीत नव्हते. नंतर दोन तासांनी संबंधित व्यक्ती माहिती कळाली. तो एक अपघात होतो. कळत न कळत चूक झाली. असे ते म्हणाले.