Maharashtra Politics : अजित पवार गटाला पहिला धक्का! दादांचा ‘हा’ आमदार शरद पवार यांच्या गटात माघारी परतणार, थेट खासदारकी लढवणार…

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.
यंदाची निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून पुणे लोकसभेकडे राज्याच्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. अशातच आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून आमदार निलेश लंके हे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे .
त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुजय विखे पाटील अशी लढत होणार हे नक्की आता झाले आहे. निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. Maharashtra Politics
दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभेसाठी इच्छुक होते. पण अजित पवार गटाला तीन ते चारच जागा मिळण्याच्या चर्चेमुळे त्यांची चांगलीच अडचण झाली होती. आता शरद पवारांची साथ दिल्यानंतर ते लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.
दरम्यान, लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा अशी साद काहीच दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना घातली होती. कोल्हेंच्या त्या आवाहनाला आता निलेश लंके यांनी प्रतिसाद दिला आहे.