Nilesh Lanke : निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरेकडून गर्भवती महिलेवर हल्ला, भाजपचा गंभीर आरोप, अहमदनगरमध्ये मोठी खळबळ..


Nilesh Lanke : देश आणि राज्याप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातही भाजपच्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांनी मोठी आघाडी घेत भाजपच्या डॉ. सुजय विखे यांचा पराभव केला.

नगरमध्ये लंके विरुद्ध सुजय विखे पाटील ही लढत अत्यंत चुरशीची झाली. मात्र, निकाल लागल्यापासून येथे मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे. दोनच दिवसांपुर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा झाला.

यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. आता या प्रकरणावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केला असून निलेश लंके यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. Nilesh Lanke

ट्विट करत चित्र वाघ म्हणाल्या, “ये जंगलराज नही चलेगा… आम्हाला निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न दाखवून दिला…

चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप..

पारनेरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करण्यास सुरुवात केली. हाती दहा-पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू केला.

यांच्या डोक्यात सत्ता इतकी गेली की उन्मत्त झालेल्या या राहुल झावरेने पानबंद यांच्या घरात घुसून एका गर्भवती महिलेवर आणि पानबंद यांच्या मातोश्रींवर शिवीगाळ करत जमावासह हल्ला केला. असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की,या नराधमाला कायदा तर शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार लंके आणि यांची नेता मोठ्ठया ताई या हरामखोर झावरेला शिक्षा देणार का पाठीशी घालणार हे पहावं लागेल. म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे आणि मिरवता देखील आला पाहिजे.

पण महविकास आघाडीच्या डोक्यात सत्ता जाऊ लागली.त्यांचा माज जय शिवरायांच्या पावनभूमीत सहन केला जाणार नाही…झावरे सारख्या औरंग्याच्या औलादिंना या जिजाऊच्या लेकीच धडा शिकवतील. असं चित्रा म्हणाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!