Nikhil Wagle : निखिल वागळे हल्याप्रकरणी मोठी माहिती आली समोर, पोलिसांनी भाजपच्या..


Nikhil Wagle : पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हल्याप्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. या हल्ल्याप्रकरणी भाजपच्या दहा कार्यकर्त्यांना शनिवारी अटक करण्यात आली.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, वागळे आणि इतरांना सार्वजनिक सभेला घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी शहरातील पर्वती पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. Nikhil Wagle

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम १४७ (दंगल), ३२४ (स्वैच्छिकपणे धोकादायक शस्त्र किंवा साधनाने दुखापत करणे), ३३६ (जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या कृत्याने गंभीर दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IPC, 427 (मालमत्तेचे नुकसान करणे) आणि इतर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नरेंद्र मोदी सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केल्याबद्दल एका निखिल वागळे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. वागळे व कार्यकर्ते असीम सरोदे व विश्वंभर चौधरी हे पोलीस संरक्षणात या गाडीतून प्रवास करत होते.

नेमकं काय घडलं?

पुण्यातल्या खंडोजी बाबा चौकात निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आता महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीच्या तरुण कार्यकर्त्यांनी या हल्ल्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे.

हल्ला करणाऱ्यांनी निखिल वागळे यांच्या समर्थकांवर अंडे फेकल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. हल्ला झाला तेव्हा निखिल वागळे, वकील असीम सरोदे हे गाडीतच होते. ते त्याच गाडीने कार्यक्रमस्थळी आले आणि सभेला उपस्थित राहीले. भाजपच्या आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या आंदोलकांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!