पुणे विमानतळावर नव्या टर्मिनलवरून लवकरच उड्डाण होणार, 75 टक्के काम पूर्ण…!
पुणे : सध्या पुणे विमानतळावर नव्या टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले होते. आता 75 टक्के काम पूर्ण झाले असून, सध्या येथे सीसीटीव्ही बसविणे, कन्व्हेअर बेल्ट बसविणे , सरकता जिना आणि इलेक्ट्रिकची कामे सुरू आहेत . यामुळे लवकरच हे लोकांच्या सेवेत जाणार आहे.
या ठिकाणी आता खाद्यपदार्थ आणि दुकानांसाठी 36 हजार चौरस फूट जागा पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधा असलेली प्रसाधनगृहे अत्याधुनिक नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल हे वातानुकूलित प्रवाशांचे मनोरंजन, व्यावसायिक वापरासाठी 15 हजार चौरस फूट जागा आहे.
तसेच 5 नवीन मार्ग पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज, 8 स्वयंचलित जिने, 15 लिफ्ट 34 चेक-इन काउंटर प्रवासी सामान वहन यंत्रणा असणार आहे. पुणे विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
दिवसाला 200 पर्यंत विमानांचे उड्डाण होत असून, त्याद्वारे 30 हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. या वाढलेल्या प्रवाशांच्या अतिरिक्त बोजाचा ताण जुन्या विमानतळ टर्मिनल आणि प्रशासकीय यंत्रणेवर पडत आहे. यामुळे आता ताण कमी होणार आहे.