संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा खुलासा, हादरवणारी माहिती आली समोर..


बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण करताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. आरोपींनी संतोष देशमुख यांना गॅसचा पाईप, गाडीच्या वायरच्या चापकाने, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप याने मारहाण करण्यात आली होती.

सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या वेपन रिपोर्टनुसार, देशमुख यांना मारण्यासाठी चार जीवघेण्या हत्यारांचा वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर तब्बल १५० जखमा आढळल्या आहेत. हे प्रकरण आता अधिक गंभीर व क्रूर असल्याचे सिद्ध झाले आहे.

तसेच ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करून ठार मारण्यात आले. आता या हत्येतील वापरलेल्या हत्यारांचा शास्त्रीय अहवाल समोर आला असून, त्यामध्ये गॅस पाईप, गाडीच्या वायरचा चाबूक, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप यांचा वापर झाल्याचे नमूद आहे. तपास यंत्रणांनी सदर अहवाल न्यायालयात सादर केला असून, तो पुरावा म्हणून महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, वरील चारही हत्यारे कराड गँगने (karad gang) खास देशमुख यांना मारण्यासाठी तयार केली होती. यापूर्वीही या गँगने इतर घटनांमध्ये याच प्रकारच्या हत्यारांचा वापर केला असल्याची माहिती समोर आली आहे. हत्यारांच्या तीव्रतेमुळे देशमुख यांना झालेल्या जखमा अतिशय गंभीर होत्या आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला.

एका सरकारी अहवालानुसार, जर एखाद्याला या प्रकारच्या हत्यारांनी मारले गेले, तर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता निश्चित असते. त्यामुळे ही हत्या पूर्वनियोजित आणि क्रूर हेतूने करण्यात आली होती, हे स्पष्ट होते. व्हिडीओ रेकॉर्डिंगसह मारहाण केल्याचा तपशील याआधीच समोर आला होता, ज्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!