NCRB Report : भ्रष्टाचारात महाराष्ट्र नंबर वन! राज्यात नोकरशाही सर्वाधिक भ्रष्ट, धक्कादायक आकडेवारी आली समोर, जाणून घ्या…

NCRB Report : आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. याबाबत अनेकजण अटकेत आहेत. मात्र तरीही हे काम कमी होत नाही. आता देशात सर्वाधिक भ्रष्ट राज्यांच्या यादीत महाराष्ट्रातील नोकरशाही सलग तिसर्या वर्षीही प्रथम क्रमांकावर बदनाम असल्याचे चित्र आहे.
या आकडेवारीने राज्यातील नोकरशाही भ्रष्टाचाराच्या किडीने पोखरून निघाल्याचे स्पष्ट होते. त्याच वेळेला राज्यातील जनता या भ्रष्टाचाराविरुद्ध संतप्त असून, ‘एसीबी’च्या कार्यक्षमतेमुळे तक्रार करण्याचे धाडसही दाखवू लागल्याचे सकारात्मक चित्रही यानिमित्ताने निर्माण झाले आहे.
यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. आपल्या देशातील सर्वात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रात होत असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्थोच्या अहवालातून NCRB Report समोर आली आहे. यामध्ये दररोज अनेक तक्रारी देखील येत आहेत. NCRB Report
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडविधानातील (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत वर्ष २०२२ मध्ये देशात सर्वाधिक ७४९ गुन्हे नोंदवले गेले. यामुळे हा आकडा इतरांच्या तुलनेत मोठा आहे. यामुळे हे रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
२०२१ मध्ये हीच आकडेवारी ७७३, तर २०२० मध्ये ६६४ अशी होती. २०२०, २०२१ आणि आता २०२२ च्या आकडेवारीचा विचार करता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सर्वाधिक गुन्हे या तिन्ही वर्षी महाराष्ट्रात नोंदविण्यात आले आहेत.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आल्यानंतरही दोषींना शिक्षा होण्याचे राज्यातील प्रमाण अतिशय कमी असून, ते चिंताजनक आहे. यामुळे दरवर्षी हा आकडा वाढतच आहे.