बारामतीच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच ठरलं! अजितदादा की पवार साहेब, घेतला मोठा निर्णय..
बारामती : बारामतीचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत थेट भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेकांना धक्का बसला. आता बारामतीत मोठा पेच निर्माण झाला आहे.
कोणाला पाठिंबा देयचा असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर आहे. बारामतीतील अनेक कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवून आम्ही दादांबरोबर राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केलेले आहे. आता हळू हळू अनेक गोष्टी समोर येत आहेत.
राष्ट्रवादीत अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार असे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले आहेत. अजित पवार यांचे किती समर्थक आमदार आहेत याबाबतचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. याबाबत आज आकडा समोर येणार आहे.
दोन्ही गटाच्या प्रमुखांकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच दोन्ही गटाकडून आमदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. याचदरम्यान आता बारामतीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या बैठकीला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बारामतीमध्ये सहकारी संस्थावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक बोलावली आहे. तर अजित पवार यांनी वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये बैठक बोलावली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार कोणत्या बैठकीला जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अनेकांनी अजित पवार यांच्याच बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.