जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही, ‘पत्रकारांनो स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? – अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते विधानसभेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू आहे.
या सर्व चर्चांवर अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहेे.मी आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल विनाकारण गैरसमज’ मी कोणाच्याही सह्या घेतल्या नाहीत. कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही,
40 आमदारांच्या सह्या कुणीही घेतल्या नाही. सही घेण्याचं काहीही कारण नाही. या बातम्यांना काहीही आधार नाही. कुणी काय मत व्यक्त करावं हा त्यांचा अधिकार आहे, असंही त्यांनी म्हटले आहे.
पत्रकारांनो स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? राष्ट्रवादी जीवात जीव असेपर्यंत सोडणार नाही, पवार साहेबच आमचे नेते’, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे. यामुळे या चर्चा बंद करा असेही ते म्हणाले.
अनेक आमदार कामानिमित्त येत असतात. आजही नेहमीप्रमाणे आमदार भेटायला आले होते. आमदारांची वेगवेगळी कामं होती, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. यामुळे आता या चर्चा बंद होणार का हे लवकरच समजेल.