Nawab Malik : मतदानापूर्वीच नवाब मलिक तुरुंगात जाणार? समोर आली महत्त्वाची माहिती..
Nawab Malik : भाजपचा विरोध झुगारुन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्यावर गंडांतर ओढावण्याची शक्यता आहे. कारण, विधानसभा निवडणुकीचा प्रचार निर्णायक टप्प्यावर पोहोचला असताना नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अणूशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात जावं लागू शकतं, अशी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. Nawab Malik
तसेच नवाब मलिक दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मलिकांना जामीन मंजूर केला होता, परंतु सध्या त्यांच्यावर मनी लॉंड्रिंग आणि अंडरवर्ल्डशी संबंधित गंभीर आरोप आहेत. या कारणामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, नवाब मलिक सध्या शिवाजी नगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीत सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. भाजपने त्यांच्याविरुद्ध उमेदवार उभा केला असून, त्यांची उमेदवारी विरोधी पक्षांकडून विरोधाला सामोरी जात आहे.