राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाच्या वतीने उत्कृष्ट कारखान्यांचा गौरव, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ठरला गाळपात एक नंबर..


नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हादजी जोशी, राज्य मंत्री निमूबेन बमभानिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हरियाणा राज्याचे कॅबिनेट मंत्री अरविंद कुमार शर्मा जी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघामध्ये देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने आणि नऊ राज्यातील साखर संघ सदस्य आहेत, या संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांना विविध पुरस्कार दिले जातात. तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप आणि सर्वोत्तम साखर उतारा अशा विविध क्षेत्रांतील देदीप्यमान कामगिरीबद्दल हे मानाचे गुणवत्ता पारितोषिके दिले जातात.

यावर्षी हा सोहळा राजधानी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे संपन्न झाला. यामध्ये पारगाव (ता.आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२३-२४ करीता देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना प्रदान करण्यात आला.

तसेच बारामती येथील हंगाम २०२३-२४ साठी ‘उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ हा मानाचा पुरस्कार सोमेश्वरला प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांबाबत अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी माहिती दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!