Narendra Modi : २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली, अनेक ठिकाणी रोड बंद, मोदींच्या सभेसाठी अनेकांची गैरसोय, नागरिकांचा संताप….

Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल सोलापूरमध्ये सभा पार पडली. यावेळी वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला होता, तसेच अनेक रोड बंद करण्यात आले होते. सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद मोदी यांची होम मैदानावर सभा झाली.

सभेसाठी सकाळी ११ वाजल्यापासून शहरातील मुख्य पाच मार्ग बंद केले होते. तर सभेला येणा-यांसाठी सहा ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी ३ नंतर शहरातील प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यात आली.

यावेळी २० मिनिटे अंत्ययात्राही रोखण्यात आली होती. या सभेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संमेश्वर कॉलेज, रंगभवन, सिद्धेश्वर प्रशाला परिसर, पार्क चौक, डफरीन चौक आदी ठिकाणची वाहतूक सकाळी ११ दुपारी ३ वाजेपर्यंत इतरत्र वळविण्यात आली होती. Narendra Modi

यावेळी रिक्षा, टमटमसह इतर नियमित प्रवासी वाहतूकही सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत बंद होते. सायंकाळच्या सत्रात प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यात आली. अनेकांनी यावेळी संताप व्यक्त केला. यावेळी सभेला उपस्थित राहिलेल्या लोकांना वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.
नागरिकांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहने लावण्याकरिता शहरात सहा ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली होती. अक्कलकोटकडून येणारी वाहने सिव्हिल चौकात नागरिकांना उतरवून पुंजाल मैदान किंवा नूमवि प्रशालेच्या मागे मुलांचे शासकीय वसतिगृह मैदानावर लावण्यात आली.
