Narendra Modi : मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी, महिलेला घेतलं ताब्यात…

Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा कसून शोध घेतला गेला. आता या प्रकरणी अंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
बुधवारी रात्री ९ च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा हा फोन आला. मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
मुंबई पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. यामध्ये कॉल करणारी व्यक्ती एक महिला असल्याचा दावा करण्यात येतोय. या कॉल प्रकरणी शितल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. Narendra Modi
या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासात महिला मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याच कळतय. स्टँडर्ड प्रोसिजरनुसार पोलिसांकडून तपास सुरु आहे. या महिलेच वय ३४ वर्ष असल्याचे समजत आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मागच्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सध्या राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. या दरम्यान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा हा फोन कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.