लाचखोर म्हणून पकडले गेले तरी नावे गुप्त ठेवा! सरकारी कर्मचाऱ्यांचे हे जरा आतीच होतंय…


पुणे : सरकारी कर्मचाऱ्यांनी सध्या एक अजब मागणी केली आहे. लाचखोरीच्या प्रकरणात पकडले गेलेले सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर खटला चालतो. अनेक प्रकरणांमध्ये ते नंतर निर्दोष ठरतात. परंतु दरम्यानच्या काळात त्यांची खूप बदनामी होते, असे त्यांचे म्हणणे आहे.

यामुळे आता लाचखोर म्हणून पकडले गेले तरी नावे गुप्त ठेवा अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले तरी नावे आणि फोटो प्रसिध्द करण्यास मनाई करावी. अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारीवर्गाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

दरम्यान, अनेक प्रकरणात न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांची ओळख गुप्त ठेवावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय घेणार याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र सर्वसामान्य लोकांमधून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!