‘या’ स्टेडियमला शरद पवारांचे नाव द्या! धनंजय मुंडेंचे रोहित पवारांना पत्र


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोठी मागणी केली आहे. ते म्हणाले, पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचे नाव द्या.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय त्याचबरोबर आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांचे क्रीडा विश्वात व विशेष करून क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे.

दरम्यान, भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या निवृत्त क्रिकेटर्सला पेन्शन सुरू करणे यासारखे मोठे निर्णय पवारांच्या कारकिर्दीत होऊ शकले, असेही मुंडे म्हणाले.

गुजरातमध्ये मोटेरा स्टेडियमला ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले, तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मालकीच्या पुणे येथील गहुंजे स्टेडियमला शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी मुंडे यांनी रोहित पवार यांच्याकडे केली आहे.

यामुळे आता ही मागणी मान्य होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!