अजित पवारांनी नेमकं कोणतं इंजेक्शन आणलं? गिरीश महाजनांनी थेट नाव विचारलं…!
पुणे : सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे. यामध्ये सगळेच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीत याठिकाणी मुख्य लढत होत आहे. सध्या लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी कोणी मदत केली यावरून राजकीय आरोप होत आहेत.
कालच्या सभेत आजारी असताना लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी इंजेक्शनची तजवीज केल्याचा अजित पवार यांनी सांगितले. आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवारांनी कोणत इंजेक्शन आणून दिले, त्याचे नाव सांगण्याचे आवाहन केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या रंगली आहे.
कसब्यात आजारी गिरीश बापटांना ऑक्सिजन सिलेंडर लावून प्रचारात उतरवण्यावरुन मविआ टीका करत आहे. आता चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या उपचारावरुनही आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यामुळे आता अजित पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, 26 तारखेला मतदान होणार असून यासाठी अजित पवार आणि भाजपचे काही मंत्री पुण्यात तळ ठोकून आहेत. काहीही करून या जागा जिंकायच्या असा पण या नेत्यांनी केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.