Nagpur Rain : नागपुरात पावसाचा कहर! रस्त्यांवर, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ, प्रशासनाकडून अलर्ट..


Nagpur Rain नागपूर : नागपुरातील मुसळधार पावसाने धुमशान घातले आहे. धुंवाधार पावसाने नागपुरातील रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे तर अनेक भागांत पावसाचे पाणी साचले आहे. तर, अनेकांच्या घरातही पाणी शिरले आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे. (Nagpur Rain)

पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहेत. एस.डी.आर.एफ.च्या २ तुकड्या ७ गटात विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे.

एन.डी.आर.एफ. आणि एस.डी.आर.एफ. चमूंनी आतापर्यंत १४० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मूक-बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या तलावाचे पाणी नागपुरच्या सखल भागात शिरले आणि डोळ्यांदेखत सर्व काही वाहून गेले आहे.

नागपूर शहराच्या विविध भागात २ एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे. अंबाझरी परिसरात लष्कराच्या २ तुकड्या पोहोचत आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!