Nagpur : सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण! १८ वर्षांखालील पत्नीशी शरीरसंबंध म्हणजे बलात्कारच…


Nagpur : पतीने १८ वर्षांखालील वयाच्या पत्नीसोबत ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच ठरतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदविले आहे.

वैभव गजानन टेकाम (वय २४, रा. सेवाग्राम, जि. वर्धा) असे आरोपीचे नाव आहे, तो सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात गेला होता. न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.

विशेष सत्र न्यायालयाने वैभव टेकाम याला ९ सप्टेंबर २०२१ रोजी कमाल दहा वर्षे सश्रम कारावास व एकूण ३ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. आरोपीने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसविले होते.

एक दिवस त्याने नागपूर रोडवरील फार्महाऊसमध्ये मुलीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यामुळे, तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर आरोपी वैभवने मुलीला हार घालून लग्नाचा बनाव रचला. काही दिवस उलटल्यानंतर तो गर्भपाताकरिता तिच्यावर दबाव टाकू लागला. त्याने गर्भाची जबाबदारी सुद्धा नाकारली. Nagpur

तो मुलीला मारहाणही करू लागला होता. मुलीने २५ मे २०१९ रोजी सेवाग्राम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या विरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने ठोस पुरावे व कायदेशीर तरतुदी लक्षात घेता अर्ज फेटाळण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने स्वतःचा बचाव करताना, १८ वर्षाखालील वयाची पीडित मुलगी त्याची पत्नी असून तिच्यासोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले, त्यामुळे त्याला बलात्काराच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवता येणार नाही, असा दावा त्याने केला होता.

उच्च न्यायालयाने हा दावा गुणवत्ताहीन ठरवून १८ वर्षांखालील वयाची मुलगी विवाहित असो किंवा नसो, तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवणे बलात्कारच ठरतो, तसेच या मुलीने शरीरसंबंधासाठी दिलेल्या सहमतीलाही कायद्यात काहीच अर्थ नाही, असे नमूद केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!