विहीरीची रिंग कोसळण्याची घटना ताजी असताना इंदापूरमध्ये अजून एक दुःखद घटना, लाकडीत माय-लेकीचा विहिरीत पडून मृत्यू…

इंदापूर : घराशेजारी असलेल्या विहिरीत पडून माय – लेकीचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे घडली आहे.
जयश्री अनिल वणवे (वय. २२) व आरुषी अनिल वणवे (वय दीड वर्षे) या माय-लेकीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावरती शोककळा पसरली.
मिळलेल्या माहिती नुसार, शुक्रवारी (ता. २५) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जयश्री वणवे या कपडे धुण्यासाठी दीड वर्षाची मुलगी आरुषी हिला घेऊन घराजवळच्या विहिरीजवळ गेल्या होत्या.
विहिरीतील पाण्यामध्ये बुडून दोघींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, मृत्यू झालेली महिला दोन महिन्याची गरोदर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत गावामध्ये गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली नव्हती. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते.