मेरठ हत्याकांडातील आरोपी मुस्कान गर्भवती, पोलिसांच्या तपासात आता वेगळीच माहिती आली समोर, तपासाला वेगळं वळण..


मेरठ : क्रूर हत्याकांडामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उसळी अशा उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये झालेल्या घटनेत रोज नवीन माहिती समोर येत आहे. येथे पतीची हत्या करून प्रियकराच्या मदतीने शवाच्या तुकड्यांचा निळ्या ड्रममध्ये पुरलेली घटना सगळ्यांना धक्का देणारी आहे. मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांनी मिळून मुस्कानच्या पती सौरभ राजपूतची हत्या केली होती.

आता या प्रकरणी या प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्कान रस्तोगी हिच्या गर्भवती असल्याचे आता उघडकीस आले आहे. ती किती महिने गर्भवती आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हत्या केल्यानंतर दोघांनी मृतदेहाचे तुकडे करून त्या तुकड्यांना सिमेंट आणि पाणी घालून एका ड्रममध्ये भरले आणि ड्रम बंद केले.

त्यानंतर हत्या करणाऱ्या जोडीने हिमाचल प्रदेशात जाऊन लग्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत. मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि सौरभच्या हत्या नंतर दोघे ११ दिवस हिमाचल प्रदेशात सुट्टीवर गेले होते. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ते दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात असून ते घरी देखील अनेकदा भेटत होते. आता मुस्कान गर्भवती असल्याचे तपासात समोर आले आहे. गर्भवती असल्याचे समोर येताच, तिच्या रुग्णालयात तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीची गरज आहे. मुस्कान आणि साहिल दोघेही सध्या तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप आहेत.

सौरभ राजपूत हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते आणि नंतर लंडनमध्ये बेकरीत काम करत होते. फेब्रुवारी २०२५ मध्ये ते भारतात परत आले होते आणि काही दिवसांनंतरच त्यांची हत्या करण्यात आली. मुस्कानच्या मुलीच्या माहितीवरून हत्येचा सुगावा लागला. यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!