Munawar Faruqui : ‘माझं कोकणावर खूप खूप प्रेम…’, वादग्रस्त वक्तव्यानंतर मुनव्वर फारुकीने मागितली जाहीर माफी, नेमकं प्रकरण काय?

Munawar Faruqui : स्टँड अप कॉमेडियन आणि बिग बॉस स्पर्धक मुनव्वर फारुकी कायमच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. असंच विधान नुकतंच त्याने एका स्टँड अपशोमध्ये केलं आहे. पण यावेळी त्याने महाराष्ट्रातील कोकणी माणसाशी पंगा घेतला आहे. त्यामुळे चहुबाजूंनी त्याच्यावर टिका होत आहे.
मुन्नावर फारुकी याने त्याच्या स्टँडअप दरम्यान कोकण, महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी वापरलेल्या भाषेमुळे वाद वाढला. मुनव्वर याच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत त्याने माफी मागावी अशी मागणी केली आहे. वाढता वाद पाहता मुन्नावर फारुकी याने आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.
मुनव्वर फारुकी याने ‘एक्स’ या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. तो म्हणाला, “मी येथे काहीतरी खुलासा करण्यासाठी आलो आहे. काही काळापूर्वी एक कार्यक्रम झाला होता, ज्यामध्ये प्रेक्षकांशी संवाद साधला असता, कोकणाबद्दल काहीतरी समोर आले होते. Munawar Faruqui
मला माहित आहे की तळोजा येथे कोकणातील बरेच लोक राहतात. कोकणातील माझे अनेक मित्रही तिथे राहतात, पण माझे शब्द संदर्भाबाहेर काढले गेले. एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून माझा हेतू कोणालाही दुखावण्याचा नाही.”
त्याचबरोबर पुढे मुनव्वर म्हणाला, “लोकांना वाटतंय की त्याने कोकणची आणि कोकणात राहणाऱ्या लोकांची चेष्टा केली, पण त्याचा असा कोणताही हेतू नव्हता. त्याला कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या आणि त्याच्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्वांची जाहीर माफी मागतो.
कोकणावर खूप खूप प्रेम आणि माझी माफी❤️ pic.twitter.com/pUSPYuZ9Kf
— munawar faruqui (@munawar0018) August 12, 2024
काय म्हणाला होता मुनव्वर फारुकी…
तुम्ही सगळेजण बॉम्बे म्हणजे मुंबईतून आलात की? कुणी प्रवास करुन आलंय, असा प्रश्न मुन्नवरने कार्यक्रमात विचारलं. तेव्हा एका व्यक्तीने आम्ही तळोज्याहून आल्याचं सांगितलं. तेव्हा मुन्नवर म्हणाला की, आता विचारलं तर सांगत आहेत. तळोजे मुंबई बाहेर झालं. यांचे गाववाले विचारत असतील तर सांगत असतील, मुंबईत राहतो. हे कोकणी लोक चु** बनवतात सगळ्यांना.
मुन्नवर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या लोकांना तळोजे वरुन आलेल्या व्यक्तीला तू कोकणी आहेस का? असा देखील सवाल केला. आणि तो देखील हो म्हणाला. यावर मुन्नवर फक्त हसला…