Mumbai Police : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मुंबईत घातपात घडविणार? मुंबई पोलीस यंत्रणा अलर्टवर, नेमकं घडलं काय?

Mumbai Police : एका अज्ञात व्यक्तीने फोन करून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा माणूस मुंबईत येऊन मोठा घातपात घडविणार अशी माहिती मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला दिली होती. या कॉलनंतर मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाने स्थानिक पोलिस स्थानकाशी संपर्क साधून यंत्रणेला सतर्क केले आहे.

मात्र मुंबई पोलिसांना शुक्रवारी उशिरा रात्री आलेल्या या कॉलबाबत मुंबई पोलीस तपास करत असून अज्ञात कॉलरचा शोध घेत आहेत. बई पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि मुंबई पोलीस सतर्क झालेत.
गेल्या चार महिन्यांमध्ये मुंबई पोलिसांना एकूण अज्ञात व्यक्तींचे ८ हॉक्स कॉल आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात पोलिसांना दोन धमकीचे मेल आले होते. शुक्रवारी उशिरा रात्री एका अज्ञात व्यक्तीनं मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन सांगितलं की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा माणूस मुंबईत येऊन मोठी घटना घडवून आणणार आहे. मुंबई पोलिसांनी दादर स्टेशनचा कॉलरनं उल्लेख केल्यामुळं जीआरपी आणि आरपीएफशी देखील संपर्क साधला आणि त्यांना अलर्ट केले आहे. Mumbai Police

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने एक कॅब बुक करण्यात आली होती.
ही कॅब बुक होताच पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. दरम्यान, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कॅब बुक करणा-या २० वर्षीय तरुणाला शुक्रवारी अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित त्यागी असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील आहे.