मुंबई पुन्हा सुन्न!! कॅब चालकाचा प्रियकर-प्रेयसीने केला शेवट, डोक्यावर हातोडीचे घाव अन् डोळे फोडून बॉडी….

मुंबई : उलवे येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका कॅब चालकाची हातोड्याने हल्ला करत डोळे फोडल्याने या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.
याप्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रेयसीसह प्रियकरावर काल (ता.६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅब चालकाच्या हत्येनंतर दोघेही कॅब घेऊन पुणे, नाशिकला गेल्यानंतर तेथे त्यांच्या हातून घडलेल्या अपघातांमुळे या खुनाचा उलगडा झाला आहे.
मोहगावात राहणाऱ्या संजय पांडे (वय.४४) यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना काल (रविवारी) उघडकीस आली आहे. तीन दिवसांनी त्यांच्या घरातून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
क्यावरती निर्घृणपणे हातोडीचे घाव घालून, आणि त्याचे डोळे फोडून त्यांची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच ठेवण्यात आला होता. ही हत्या २ एप्रिलला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिया सरकन्यासिंग (वय. १९ वर्षे) व तिचा प्रियकर विशाल शिंदे (वय.२१ वर्षे) यांनी ही हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर उलवे पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, रिया, विशाल हे दोघे पांडेच्या कॅबमधून नियमित पुण्याला जात असल्याने त्यांच्यात ओळख झाली होती. मात्र, घटनेच्या दिवशी पांडेच्या घरी रिया असताना तिथे विशाल आला होता. कॅबचालक पांडे ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप रियाने केल्यानंतर दोघांनी मिळून पांडेची निर्घृण हत्या केली.
हत्येनंतर त्याचीच कार व मोबाइल घेऊन दोघेही पुण्याला आले. मात्र, तिथे त्यांच्याकडून अपघात झाल्याने संबंधित वाहनचालक त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जाताना त्याला चकवा देऊन ते नाशिकला पळून गेले. पुण्यातील अपघातानंतर चकवा देऊन पळून गेले, मात्र, शनिवारी रात्री नाशिकमध्येही त्यांच्याकडून अपघात झाल्यानंतर ते दोघे पोलिसांना सापडले.
दरम्यान, कार मालकाबद्दल केलेल्या चौकशीत त्यांनी कॅबचालक पांडेच्या हत्या केल्याची त्यांनी कबुली दिली. नाशिक पोलिसांनी याबाबत कळवले असता पांडेच्या घरझडतीमध्ये मृतदेह मिळाल्याचे सहायक पोलिस आयुक्त विशाल नेहूल यांनी सांगितले आहे.