Mumbai Indians : सूर्याला आयपीएलमध्ये दुप्पट किंमत, महत्वाची माहिती आली समोर…

Mumbai Indians : टी-२० फलंदाजांपैकी एक असलेल्या सूर्यकुमार याची वर्षभरापूर्वी त्याची व्यक्तिरेखा वेगळी होती, पण काही महिन्यांपूर्वी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आणि नंतर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर सर्व काही बदललेले दिसत आहे.
बीसीसीआय सर्वांना चकित करत हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवेल, पण असे कुणालाही वाटले नव्हते. त्यामुळे यांचा परिणाम पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल, मेगा लिलावावर होणार आहे हे नक्की. बदललेल्या समीकरणानंतर मुंबईचा कर्णधार बदलला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली.
पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, सूर्यकुमार यादवची आयपीएल सॅलरीमध्ये मोठी वाढ होणार आहे आणि ती दुप्पटही असू शकते. नवीन नियमांनुसार, फ्रँचायझी राइट-डु-मॅट किंवा मेगा लिलावाद्वारे एकूण सहा खेळाडूंना कायम ठेवू शकते.
तसेच, कोणताही संघ जास्तीत जास्त पाच कॅप्ड (भारतीय खेळाडू आणि परदेशी खेळाडू) आणि दोन अनकॅप्ड खेळाडू निवडू शकतो. संघांची पर्सही १०० कोटी रुपयांवरून १२० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. Mumbai Indians
दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्स सूर्यकुमार यादवला वार्षिक ८ कोटी रुपये देत आहे. आता बदललेल्या परिस्थितीनंतर पहिला प्रश्न असा आहे की मुंबईचा कर्णधार कोण होणार? मात्र, हार्दिकचा वरचष्मा आहे.
अव्वल तीन खेळाडू कोण असतील? मुंबई इंडियन्सने यादवला पहिल्या पाच खेळाडूंमध्ये कायम ठेवल्यास त्याची सॅलरी ११ ते १८ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सूर्यकुमार यादवच्या शुल्कात दुपटीने वाढ होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले आहे.