Mumbai Boat Accident : मुंबईत मोठी बोट दुर्घटना! १३ जणांचा मृत्यू, ९८ जण जखमी, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर…

Mumbai Boat Accident : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ज्यात तीन नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

तसेच १०१ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, ९८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची स्थिती चिंताजनक आहे. दुर्घटनेत ज५ ण अद्याप बेपत्ता आहेत.
दरम्यान, काल दुपारी ३:५५ वाजता घडलेली ही दुर्घटना अरबी समुद्राच्या बुचर आयलंड परिसरात घडली. नंतर तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आले आणि नौदल, कोस्ट गार्ड आणि पोलिसांच्या मदतीने १०१ जणांची सुटका केली. Mumbai Boat Accident

मृतांमध्ये ७ पुरुष, ४ महिला आणि २ बालकांचा समावेश आहे. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यात जीनपीटी, नेव्ही डॉकयार्ड आणि सेंट जॉर्ज रुग्णालयांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे आणि घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.