Mumbai : धक्कादायक! पतंगाच्या मांजाने घेतला पोलीस कर्मचाऱ्याचा जीव, घटनेने परिसरात हळहळ..


Mumbai : मुंबईन एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. घरी परतत असतानाच पोलीस हवालदारावर काळाने घाला घातला आहे. पतंगाच्या मांजाने गळा चिरल्याने एका ३७ वर्षीय पोलीस हवालदाराचा रविवारी दुपारी मृत्यू झाला.

समीर सुरेश जाधव असे मृत पोलिस हवालदाराचे नाव असून याप्रकरण खेरवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्या दुर्दैवी, अकस्मात मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, वाकोला परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. समीर जाधव वरळीतील बीडीडी चाळीत वास्तव्यास होते तर गोरेगावमधील दिंडोशी पोलिस ठाण्यात ड्युटी करत होते. Mumbai

रविवारी (ता.२४) दुपारी काम संपवल्यानंतर जाधव त्यांच्या बाईकवरून घरी परत जात असतानाच वाकोला पुलावर त्यांच्यासमोर अचानक पतंगाचा एक मांजा आला. त्यातून वाचण्याचा प्रयत्न करत असतानाचा त्या मांजाने त्यांचा गळा चिरला गेला.

रक्त येत असल्याने ते स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होचे, मात्र तेवढ्यात ते बाईकवरून खाली पडून गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या वाहनचालकांनी हा प्रकार पाहिला आणि गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. खेरवाडी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी समीर जाधव यांना तातडीने सायन रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली. जाधव यांचा मृत्यू झाला होता.

त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. ते पोलिस दलात कार्यरत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर दिंडोशी पोलिस आणि जाधव यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!