MSRTC Recruitment : नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य परिवहन विभागांतर्गत ‘या’ जागांची होणार भरती, जाणून घ्या..


MSRTC Recruitment : राज्यातील विधानसभा निवडणुकापार पडल्यानंतर आदर्श आचारसंहिता देखील शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे, आता भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागांतर्गतही कर्मचारी व विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते.

दरम्यान राज्य मार्ग परिवहन विभागाच्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात २०८ शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. MSRTC Recruitment

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत शिकाऊ उमेदवार (महिला / पुरुष) पदांच्या एकूण २०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०२४ आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा…

यामध्ये ७५ मोटर मेकॅनिक, ३० शिटमेटल, ३४ डिझेल मेकॅनिक, ३० मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक, २० वेल्डर, १२ रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेअर, २ टर्नर, ५ पेंटर जनरल या पदांचा समावेश आहे.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता १० वी पास आहे. तर वयोमर्यादा १८-३३ वर्षे अशी आहे. अर्ज करण्यासाठीचे शुल्क इतर सर्व उमेदवारांसाठी ५९० रुपये तर एस सी?एसटी /PwBD या उमेदवारांसाठी २९५ एवढे शुल्क आकारले जाणार आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी https://msrtc.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!