MPSC मध्ये खळबळ!! परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच देण्यासाठी 40 लाखांची मागणी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, नेमकं घडलं काय?

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससीमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पुर्व ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे फोन आल्याची माहिती पुढे आली आहे.

याबाबत महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक व्हॉट्सअप कॉलवर एक मीटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल. असं बोलणारे भाषण रेकॉर्ड झाले असून याबाबत तपास सुरू आहे.
तसेच त्याच विद्यार्थ्याला दुसरा फोन आला. त्यात आपण गट ब च्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. आपण या पदाची तयारी करत आहात. तर आपल्यासाठी एक ऑफर आहे. आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका २ फेब्रुवारी पूर्वी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील. असाही फोन आल्याचे समोर आले आहे

तसेच विश्वास नसेल तर या परीक्षेला एक ही रुपया नाही दिला तरी चालेल. फक्त आपले ओरिजनल कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेला देखिल प्रश्नपत्रिका दिली जाईल. असेही फोन आल्याची माहिती आहे. या फोन कॉलबद्दल कोणाला काही बोलू नका, असे सांगितले जात आहे.
यामुळे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे भरतीत मोठा घोटाळा होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यामुळे या पेपरमध्ये किती पारदर्शकता आहे हे येणाऱ्या काळात समजेल.