MPSC Chairman : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती..

MPSC Chairman मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकतेच याबाबतचे आदेश दिले आहे. राज्य लोकसवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांचा कार्यकाल १९ सप्टेंबर रोजी संपल्यानंतर आयोगावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. MPSC Chairman
नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रियाही राबविण्यात आली. पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या नियुक्तीवर महायुतीच्या नेत्यांचे एकमत झाले असून त्यानुसार सेठ यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली होती. सेठ अखिल भारतीय पोलीस सेवेतून नियत वयोमानानुसार डिसेंबर रोजी निवृत्त होणार होते. MPSC Chairman
मात्र व्हीआरएस घेऊन ते ते नव्या पदावर रुजू होतील. सेठ यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यास पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली. सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या आणि सर्व खटल्यांतून मुक्त झालेल्या रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागू शकते.
एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा रजनीश सेठ यांनीही अर्ज केला होता.
मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून तीन नावांची यादी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठविली. त्यानंतर शासनातर्फे रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.