मोदींचा अमेरिकेत डंका! भाषणावेळी १५ वेळा उभे राहिले खासदार, ७९ वेळा टाळ्यांचा कडकडाट..


नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अमेरिकेतील संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध, दहशतवाद, अमेरिका आणि मुंबईमधील दहशतवादी हल्ले अशा विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी अमेरिकेच्या खासदारांनी तब्बल ७९ वेळा टाळ्या वाजवून मोदींना प्रतिसाद दिला.

पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी कमीत कमी १५ वेळा अमेरिकेतील खासदारांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. तर, मोदींच्या एकूण भाषणादरम्यान एकूण ७९ वेळा टाळ्या वाजल्या. पंतप्रधान मोदींचे भाषण संपल्यानंतरही बराच वेळ अमेरिकेतील खासदार उभं राहून टाळ्या वाजवत होते.

काय म्हणाले मोदी

पंतप्रधान मोदी सुमारे तासभर या सभेला संबोधित करत होते. आपल्या भाषणात त्यांनी दहशतवाद आणि कट्टरपंथ जगासाठी मोठा धोका बनत चालल्याचा उल्लेख केला. अमेरिका जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे, तर भारत सगळ्यात मोठी. त्यामुळे या दोन्ही देशांची भागिदारी लोकशाहीच्या भविष्यासाठी अगदी चांगली बाब असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाकिस्तानलाही नाव न घेता चांगलंच सुनावले.

सेल्फीसाठी झाली गर्दी

संयुक्त सत्रातील भाषणानंतर अमेरिकी काँग्रेसमधील कित्येक सदस्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. तसंच त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी, आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीही गर्दी झाली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष केविन मॅक्कार्थी यांच्या संयुक्त सत्र संबोधन पुस्तिकेवर देखील सही केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!