मनोज जरांगे यांच्यावर दुःखाचा डोंगर! मोर्चा अर्धवट सोडून गेले, कुटूंबात घडली धक्कादायक घटना…


बीड : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी राज्यातील विविध भागांमध्ये मोर्चे काढण्यात येत आहेत. बीड, परभणीनंतर आता पुण्यातही जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.

लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे या मोर्चात दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे आदींसह अनेकजण सहभागी झाले होते.

मात्र, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मोर्चातून माघारी फिरावे लागले. त्याचे कारणही समोर आले आहे. मनोज जरांगे यांना पुण्यातील जनआक्रोश मोर्चामधून माघारी जावे लागले.

दरम्यान, पुण्यातील जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे आले होते.त्यावेळी मनोज जरांगे यांनी मोर्चात आलेल्या आंदोलकांची भेटगाठ घेतली.आंदोलकांना भेटून जरांगे परतले.

मनोज जरांगे पाटील यांच्या चुलत भावाचे अपघाती निधन झाले. त्यामुळे चुलत भावाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी जरांगे पुण्यातून निघाले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जरांगे पाटील हे आजच्या जनआक्रोश मोर्चात अनुपस्थित राहणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!