धक्कादायक! सिगारेटला २० रुपये न दिल्याने आईचा हात केला फ्रॅक्चर, पुण्यातील घटना…
पुणे : सिगारेट घेण्यासाठी आईने २० रुपये दिले नाही, म्हणून मुलाने आईला बांबूने मारहाण करून त्यांच हात फ्रॅक्च केल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना कोंढव्यातून समोर अली.
सखुबाई राजाराम कांबळे (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माधव राजाराम कांबळे (वय २७) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी या घरी असतात. त्यांचा मोठा मुलगा माधव हा काही कामधंदा करत नाही. त्याने फिर्यादी यांच्याकडे सिगारेटसाठी २० रुपये मागितले. त्यांनी न दिल्याने त्याने आरडाओरडा केला. तेव्हा फिर्यादी यांचा लहान मुलगा शंकर याने त्याला बाहेर जा , असे सांगितले. तेव्हा माधव हा बाहेरुन लाकडी बांबू घेऊन आला. माधव व शंकर यांच्यात भांडणे सुरु झाली.
दोन भावांमध्ये सुरु असलेली भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी या मध्ये पडल्या. तेव्हा माधव याने आईच्या हाताचे मनगटावर लाकडी बांबु जोरात मारला. त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला.या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.