दंगेखोरांना दया ना मया! ! ॲम्ब्युलन्स पेटवून दिल्याने जखमी बाळासह आईचा मृत्यू…

इंफाळ : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार होत आहे. असे असताना आता राज्यातील इंफाळ पश्चिम जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

यामध्ये दंगलखोरांनी तीन निष्पाप लोकांचे प्राण घेतले. प्रत्यक्षात आठ वर्षांच्या जखमी मुलाला रुग्णालयात नेत असताना जमावाने ॲम्ब्युलन्स पेटवून दिली. यामुळे बालक, त्याची आई आणि अन्य एका नातेवाईकाचा मृत्यू झाला.

यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी संध्याकाळी इसोइसेम्बा येथे ही वेदनादायक घटना घडली. गोळीबारादरम्यान निष्पाप मुलाच्या डोक्यात गोळी लागल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
थरारक हत्याकांडानं पुणे पुन्हा हादरलं! प्रेम संबंधाला अडथळा ठरणार्या पतीची पत्नी व मुलीकडून हत्या
त्याची आई आणि आणखी एक नातेवाईक त्याला रुग्णवाहिकेतून इंफाळ रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. त्यानंतर अचानक जमावाने समोर येऊन रुग्णवाहिका अडवून ती पेटवून दिली. यामुळे तिघांचाही भाजून जागीच मृत्यू झाला. यामुळे आता याठिकाणी दिवसेंदिवस परिस्थिती बिघडतच चालली आहे. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.