‘मॉर्निंग वॉक’ ला जाणे मैत्रिणींना जिवावर बेतले ! बारामती – इंदापूर पालखी मार्गावरील घटना…!
वालचंदनगर : सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या त्या दोघींना आज आपला दिवस आणि दिवसाची सुरुवात आयुष्याच्या शेवटची असेल असे त्यांच्या मनातही नसेल; पण वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या समोरच काही अंतरावरच त्यांचा असा भीषण अपघात झाला की, त्या दोघींचाही दुर्दैवी अंत झाला.
संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावरील बारामती इंदापूर मार्गावर वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या समोरच झालेल्या या भीषण अपघातात दोन जणींचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज सकाळी दहा वाजता घडली. या घटनेमध्ये अनिता शिवाजी शिंदे (वय 40 वर्ष रा. जंक्शन आनंदघन तालुका इंदापूर जि. पुणे), अर्चना श्रीशैल्य सन्मट (वय 42 वर्षे राहणार जंक्शन, आनंदनगर तालुका इंदापूर) या दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, या दोघीजणी मॉर्निंग वॉक साठी निघाल्या होत्या. सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी अज्ञात वाहनाने या दोघींना उडवले. त्यात त्या दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना बारामतीला तातडीने उपचारासाठी देण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात व वाहना विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत.
बारामतीत शिवविच्छेदन
गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील लासुरने परिसरातील शिवविच्छेदनाची प्रक्रिया बंद असल्याने पश्चिम भागातील सर्वांचीच मोठी गैरसोय होत आहे. आज घटना घडली, त्यानंतर या दोघींना उपचारासाठी बारामतीला नेण्यात आले होते. त्यामुळे अखेर बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात या दोघींच्या स्वविच्छेदनाची प्रक्रिया करावी लागली. डॉ. रणजीत मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याची प्रक्रिया केली.