वाल्मिक कराडवर मोक्का अन् 10 मिनिटांत परळी बंद! परिस्थिती भयानक, वातावरण तापलं…

बीड : येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर आज मोक्का लावण्यात आला. यानंतर आज परळीत कराडच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा करत परळी बंदची हाक दिली आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोक्का लावल्यानंतर वाल्मिक कराड याच्या समर्थनासाठी परळी शहरामध्ये जोरदार आंदोलन सुरू झालं आहे. आता कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले आहेत, तसेच यावेळी महिला देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या असून त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यामुळे पोलीस यंत्रणा देखील वाढवली आहे.
दरम्यान, परळी बंदमध्ये सर्व दुकानं देखील बंद करण्यात आले. मात्र दवाखाने आणि मेडिकल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर कराड समर्थकांनी ठिय्या मांडला आहे. यामुळे अनेकजण आक्रमक झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, कराडवर मोक्का लावल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांतच बीड जिल्ह्यातील परळीमध्ये कराडच्या कार्यकर्त्यांकडून बंदची हाक देण्यात आली. परळीमध्ये एकच शुकशुकाट निर्माण झाला आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाल्मिक कराडच्या काही समर्थकांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आहे. त्यामुळे आता परळीत वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे. आता येणाऱ्या काळात या प्रकरणी नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.