Modi Government : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारने महागाई भत्त्यात केली ‘एवढी’ वाढ, पगार किती वाढणार?, जाणून घ्या..
Modi Governmen नवी दिल्ली :केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नरेंद्र मोदी सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. Modi Government
यानंतर त्यांना मिळणारा डीए आता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकार महागाई भत्त्यात वाढ करणार का? वाढ मिळाली तर किती मिळणार? अशा अनेक चर्चा सुरू होत्या.
तसेच, केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४ टक्के डीए वाढ मिळण्याची अपेक्षा होतीच. अशातच मोदी सरकारनंही ४ टक्के महागाई भत्त्याची वाढ करत दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना गोड गिफ्ट दिले आहे.
दरम्यान, मोदी सरकानं केंद्रीय कर्मचारी आणि पेशन्सधारकांना फायदा होणार असून त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये जोरदार वाढ होणार आहे Modi Government
नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केल्यानंतर आता तो ४२ टक्क्यांवरुन ४६ टक्के झाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा फायदा १ जुलै २०२३ पासून उपलब्ध होईल. महागाई भत्ता वाढल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे.
वर्ष २०२३ साठी, सरकारनं पहिली दुरुस्ती केली होती आणि २४ मार्च २०२३ रोजी डीए वाढवण्याची घोषणा केली होती, तेव्हा 38 टक्के डीए 4 टक्क्यांनी वाढवून ४३ टक्के करण्यात आला होता.
यानंतर १ जानेवारी २०२३ पासून या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार असल्याची घोषणा केली होती.