मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट! मोदींनी फडणवीसांना दिला कानमंत्र !


नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्राच्या विकासाबाबत मोदींनी फडणवीसांना कानमंत्र दिला. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्वाचं राज्य असल्याचं मोदींनी फडणवीसांना सांगितले. फडणवीस २ दिवसीय दिल्ली दौ-यावर आहेत.

यादरम्यान,त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ५ महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली.

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यावेळी आपण पहिल्यांदा मुख्यमंत्रि­पदाची शपथ घेतो तेव्हा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांची भेट घ्यायची असते. त्याप्रमाणे मी त्यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिर्घ वेळ भेट झाली. महाराष्ट्राबाबत काही चर्चा या भेटीत आमच्यात झाल्या. महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचे राज्य देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आहे. या राज्याला गतीशील ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी ते पूर्ण सहकार्य महाराष्ट्राला द्यायला तयार आहेत असं पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही तिढा नाही. अजित पवार त्यांच्या कामाने आणि मी माझ्या कामाने दिल्लीत आलो. शिंदेचे काही काम नसल्याने ते आले नाहीत. मी माझ्या पक्षातील नेत्यांच्या भेटी घ्यायला आलो.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांच्या पक्षाचे मंत्री कोण असतील ते शिंदे आणि अजितदादा ठरवतील. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील त्याचा निर्णय भाजपा संसदीय समिती ठरवते. मंत्रि­पदाचे सक्षम उमेदवार कोण असतील ते वरिष्ठ ठरवतील आणि आम्हाला सांगतील असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!